महाराष्ट्र

महाराष्ट्रात नाफेडकडून सध्या कांद्याची विक्री नाही; मोठ्या प्रमाणावर विक्री करीत नसल्याबाबत नाफेडचे स्पष्टीकरण

मुंबई: नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील, असे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago