Eknath Shinde and Nathabhau Shewale
रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, जनावरे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक गरीब कुटुंबांची घरे पावसात पडली असून, अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गरीब कुटूंबाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या-ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाई झाली आहे. तेथे सर्वांना मदत दिली जाईल, असे सांगितले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…