मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान आणि फैजल खलील शेख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वावर व काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले.काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…