मनोरंजन

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.

‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित चित्रपट असून, किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे, प्रभाकर माथपती, विठ्ठल काळे, प्रदीप दळिंबकर, शरद जाधव आणि पूनम पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकले आहेत.या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सिनेप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कधी: २४ एप्रिल २०२६

वेळ: दुपारी ४ वाजता

स्थळ: लघु नाट्यगृह, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई

प्रवेश: सभासदांसह ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago