महाराष्ट्र

मुंबई, पुणे मध्ये उबाठा व रायगड मध्ये राकॉंपा शरद पवार गटाला खिंडार

मुंबई: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत आज मुंबई, पुणे येथील उबाठाच्या व रायगड राकॉंपा शरद पवार गटाच्या आगरी कोळी समाजाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यात उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे,विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप-शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे अँडव्होकेट योगशे बापर्डेकर यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

तसेच उबाठा गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार आणि त्यांच्या टीममधील त्यांचे सहकारी स्वप्नील माने, सुनील जाधव, रुपेश सुर्वे यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच मानव आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य नयन सिंग, महेश शर्मा, संजय सोलंकी, जगदिश कुमावत, सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, सिताराम चौधरी, दिनेश चौधरी, नरेश प्रजापती, राजेंद्र मुळे, संजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी देखील शिवसेनेमध्ये दाखल झाले.

यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

4 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

5 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

5 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

7 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

7 तास ago

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

20 तास ago