महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट, नाकर्त्या व निष्क्रिय कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसूड

मुंबई पावसाळा सुरू होताच दरवर्षी पाण्यात बुडते, रस्ते खड्ड्यांनी पोखरले जातात, वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही तेच वास्तव सायन-माटुंगा, वडाळा चार रस्ता, चेंबूर, दादर, भायखळा यांसारख्या ठिकाणी दिसून आले.

आज या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहितदादा पवार, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी ठिकठिकाणी पाहणी करून थेट नागरिकांशी संवाद साधला. पाहणीतून उघड झाले की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण आहे.

महानगरपालिकेविरोधातील रोखठोक टीका नालेसफाई घोटाळा; ५०० कोटींचा सवाल

दरवर्षी नालेसफाईसाठी शेकडो कोटी खर्च दाखवले जातात, परंतु प्रत्यक्षात नाले गाळाने भरलेले व अडथळ्यांनी तुडुंब आहेत. पावसाचे पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावर साचून तलाव निर्माण करतात. “हे पैसे कुठे गेले?” हा थेट सवाल आज रोहितदादा पवारांनी उपस्थित केला. रस्त्यांवरील खड्डे – मृत्यूचे सापळे मुंबईतील बहुतेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. तरीही बीएमसी आणि सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुकीच्या जाहिरातींवर पैसा खर्च करत आहेत.पोलिस स्टेशनही पाण्यात शासनाचा निष्काळजीपणा सायन-माटुंगा पोलिस स्टेशन परिसर पाण्याखाली गेला. पोलिसांसारख्या महत्वाच्या यंत्रणेलाच पाण्याचा फटका बसत असेल तर सामान्य नागरिकांचे किती हाल होत असतील, याची कल्पनाही करवत नाही.

मुंबईकरांच्या पैशाचा गैरवापर 

मुंबईकर प्रचंड मालमत्ता कर, टोल व अन्य कर भरतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना मिळते – तुंबलेले रस्ते, खड्ड्यांचा महापूर, पाणी साचून झालेल्या साथीचे आजार आणि जीवघेणे अपघात. हा नागरिकांवरील सरळसरळ अन्याय आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी नालेसफाईसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची सखोल चौकशी व्हावी. जबाबदार अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी. नागरिकांना दिलेले कर परत पायाभूत सुविधा सुधारण्यावर खर्च व्हावेत. मुंबईला “तुंबई” बनवणाऱ्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांचा भांडाफोड करून रस्त्यावरून लढा उभारला जाईल.

आमदार रोहितदादा पवार यांचे स्पष्ट शब्दात विधान

मुंबईकर दरवर्षी कर भरूनही पाण्यात बुडत आहेत. ५०० कोटींची नालेसफाई कुठे झाली, याचा हिशोब द्यावा. अन्यथा आम्ही हा मुद्दा रस्त्यावरून आणि विधानसभेतून उचलून धरू. युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांचा इशारा “मुंबईच्या तरुणांचा संयम संपत चालला आहे. करांच्या बदल्यात सेवा न देता फक्त भ्रष्टाचार केल्यास आम्ही युवक रस्त्यावर उतरून थेट उत्तर मागू!”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा आज जगासमोर हसे होत आहे. आता नागरिकांचा संयम संपला आहे. मुंबईकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघर्ष अधिक आक्रमक पद्धतीने उभारला जाईल.

ॲड अमोल मातेले 

मुंबई अध्यक्ष,

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago