महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा जन्मदिवस ‘जनविश्वास सप्ताह’ म्हणून साजरा करणार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक २२ ते ३० जुलै दरम्यान ‘जनविश्वास सप्ताह’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या ‘जनविश्वास सप्ताहा’ मध्ये तालुका,जिल्हा, गाव पातळीवर रक्तदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिक व महिलांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे, पर्यावरणाबाबतीत अजितदादा पवार संवेदनशील असल्याने वृक्षारोपण अभियान हरित महाराष्ट्र किंवा झाड माझी; सावली झाड माझी माऊली, या थीम अंतर्गत गाव, तालुका, जिल्हा स्तरावर वृक्षारोपणाची मोहिम राबवली जाणार आहे. युवा संकल्प शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रेरणा देणे व सर्वंकष माहिती देणे, तरुण पिढी सक्रिय व सजग झाली पाहिजे असा प्रयत्न असणार आहे. ही युवा शिबीरे विभागीय किंवा शहरात त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे.

महिला सक्षमीकरणासाठी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये शिक्षण, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, सूक्ष्म कर्ज, कौशल्य प्रशिक्षण यावर चर्चा व अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देणे आदी, राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंथन सभा यामध्ये पक्षाची विचारधारा ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारावर सुरु आहे. याचे बौध्दिक सक्षमीकरण केले जाणार आहे. अजितदादा विकास प्रदर्शन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक विकास प्रकल्पांचा आढावा आणि लोकांपर्यंत प्रसार केला जाणार आहे. राष्ट्रवादी संवाद यात्रा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क वाढविण्यासाठी राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागात संवाद यात्रा काढण्यात येणार असून यामध्ये गावागावात चौपाल आयोजित करुन नागरीकांच्या समस्या जाणून घेणे व पक्षाच्या धोरणांचा प्रसार करण्यात येणार आहे अशी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago