महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उद्यापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

निर्धार नवपर्वाचा’, ‘पदाधिकाऱ्यांशी संवाद’ ;चार दिवसात आठ जिल्हे पिंजून काढणार…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उद्यापासून (१८ जुलै) चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.

आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंत संत एकनाथ रंगमंदिर येथे छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १ वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी ३.३० वाजता पक्ष कार्यालयात जालना जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर भवन येथे हिंगोली जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद, १२.३० वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, सायंकाळी ४ ते ५. ३० वाजता अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, ६ वाजता पत्रकार परिषद, दिनांक २० जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद, १२.३० वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी ३.३० ते ६ वाजता कस्तुराई मंगल कार्यालयात लातूर शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद, ६.३० ते ७ वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, १२.३० वाजता पत्रकार परिषद, दुपारी ३ ते ५ वाजता हेरिटेज हॉल गांधीनगर येथे सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी ५ वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आदी.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

4 मिनिटे ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 मिनिटे ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

11 मिनिटे ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

33 मिनिटे ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

38 मिनिटे ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

14 तास ago