राजकीय

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या असून, भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचीही राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी यांच्यासह महाराष्ट्रातील डॉ. भारती प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्राचे पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय संघटनेतील महत्त्वाच्या आर्थिक आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग ठळक झाला आहे.

संतोष यांच्याकडे संघटन सरचिटणीसपद कायम

भाजपच्या संघटनात्मक कामकाजातील महत्त्वाचे पद असलेले राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद बी. एल. संतोष यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिवांच्या यादीत कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, डॉ. भोला सिंह, डॉ. प्रदीप वर्मा, जगदीश ईश्वरभाई पटेल, डॉ. संदीप पाठक, फांगनॉन कोन्याक, संगीता यादव, अनिल अँटोनी, डॉ. एम. व्यंकटेशन, मनोज तिग्गा, सिद्धार्थ शंभू, डॉ. स्वदेश सिंह, मृगांक देव बर्मन, रोहन गुप्ता आणि जय प्रकाश यांचा समावेश आहे.

केंद्रीय कार्यालयाची जबाबदारीही निश्चित

तरुण चुघ यांच्याकडे केंद्रीय कार्यालय प्रभारीपद, तर महेंद्र पांडे यांच्याकडे केंद्रीय कार्यालय सचिवपद सोपवण्यात आले आहे. ईशान्य भारतातील संघटनात्मक कामासाठी डॉ. संबित पात्रा यांची नॉर्थ-ईस्ट कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झाली असून, राजीव बब्बर यांच्याकडे संयुक्त समन्वयकपद देण्यात आले आहे.

पक्षाच्या विविध सेल्सच्या समन्वयाची जबाबदारी विष्णू दत्त शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. रितुराज सिन्हा आणि विष्णू वर्धन रेड्डी यांची ऑल सेल्स संयुक्त समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा, महिला आणि विविध मोर्चांची नवी टीम

भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गुजरातचे डॉ. हेमंग जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छत्तीसगडच्या रूप कुमारी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाची जबाबदारी अमरपाल मौर्य, किसान मोर्चाची जबाबदारी बन्सीलाल गुर्जर, एससी मोर्चाची जबाबदारी शिवेश कुमार राम, एसटी मोर्चाची जबाबदारी डॉ. मन्नालाल रावत आणि अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी कुँवर बासित अली यांच्याकडे देण्यात आली आहे.

मीडिया आणि सोशल मीडिया टीममध्येही फेरबदल

भाजपच्या मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी अनिल बलुनी यांच्याकडे मीडिया कन्व्हेनर म्हणून देण्यात आली आहे. आशिष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची मीडिया को-कन्व्हेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया विभागाच्या प्रमुखपदी दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांची सोशल मीडिया को-कन्व्हेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या या नव्या संघटनात्मक रचनेत महाराष्ट्रातील विनोद तावडे, पीयूष गोयल आणि डॉ. भारती प्रवीण पवार यांना राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने केंद्रीय संघटनेतील महाराष्ट्राचे स्थान अधिक ठळक झाले आहे. सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

12 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

15 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

15 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago