महाराष्ट्र

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांची भेट नेहमीच नवी ऊर्जा देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र, फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याची राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा विरोधकांकडून यापूर्वी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांनाही गेल्या काही दिवसांत वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीएच्या महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने महायुतीतील संबंधांबाबतच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्याही बारकाईने पाहिले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फडणवीस यांनी मात्र ही भेट महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या तरी केंद्रीय जबाबदारी किंवा राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना आणखी वेग आला असून, आगामी काळात या भेटीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

12 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

15 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

15 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago