महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या शिबिरात विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, आमदार, विधानसभा लढलेले सर्व उमेदवार, फ्रंटल सेलचे प्रमुख व इतर सेलचे प्रमुख आणि विशेष निमंत्रित असणार आहेत.

या शिबिरात पाच वर्षाचा रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून तयार करणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवाय सभासद नोंदणी मोहीम याच महिन्यात सुरू केली जाणार आहे. त्यानंतर संघटनात्मक कामाला गती द्यायची आहे. पक्षाचे काम फक्त राष्ट्रीय स्थितीपर्यंत मर्यादित न रहाता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडित असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीत अधिक मजबूतीने कशी करता येईल यादृष्टीने विचार करणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राज्याच्या सेलप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार उपस्थित होत्या. या बैठकीत आम्ही घेतलेल्या भूमिकेपासून ज्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली होती त्याचे मुल्यमापन केले. विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा अहवालही घेतला. आगामी कालावधीत अधिक जबाबदारीने आपल्याला संघटनेची पाळंमुळं खोलवर रुजवण्याबाबत सूचना दिल्या असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

विधानसभेत आम्हाला ४१ जागांवर यश मिळाले. स्ट्राईक रेट दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. पण पक्षाचा विस्तार राज्यभर करायचा आहे. काही जिल्हयात आमचा आमदार नाही. काही जिल्हयात एक – एक आमदार आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील अशी अपेक्षा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

या बैठकीत पक्षातील जे सहकारी आहेत त्यांच्याकडून सूचना व त्यांची मते काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनेच्या पदावर जी संधी मिळाली आहे त्यात सक्रियपणे काम करण्याची सूचना केली. पक्ष आणि पक्षाची शिस्त यापुढे कसोशीने पाळली गेली पाहिजे अशी भूमिका बैठकीत मांडली. प्रवक्त्यांचीही स्वतंत्र बैठक घेतली. प्रवक्ते बोलतात त्यावेळी ते व्यक्तीगत मत नसते तर ते पक्षाचे मत असते. पक्षाची अधिकृत भूमिका असते. त्यामुळे प्रवक्त्यांची जबाबदारी ही मोठी असते. त्याबद्दल सूचना करतानाच कुटुंब म्हणून पुढच्या कालावधीत अधिक सक्षमपणे महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने यशस्वी होऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक – शेख, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

47 मिनिटे ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

50 मिनिटे ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

52 मिनिटे ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

56 मिनिटे ago

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

9 तास ago