महाराष्ट्र

पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे.

या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ने या घटनेचा निषेध केला आहे. पक्षाचे वकील अनिल घाटगे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत पुण्याच्या महापौर व उपमहापौरांचा निषेध करण्याचा ठराव मंजूर करून तो पुणे महानगरपालिकेला पाठवावा, अशी मागणी केली आहे.

अनिल घाटगे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सीमाभागातील हजार वस्तीच्या गावातही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारलेले आहेत. पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन प्रथम पुतळा बसवला आणि मेमोरियल उभारले. त्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा कोल्हापूर व बहुजन समाजाचा अपमान आहे.”

दरम्यान, या प्रकरणावर पुण्यात सर्वप्रथम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. महापौरांनी डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण केल्यानंतर शाहू महाराजांना केवळ नमस्कार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या घटनेमुळे पुणे आणि कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसकडूनही टीका

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडूनही या घटनेवर टीका करण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर प्रकरणावर महापौरांकडून अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

47 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

51 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

56 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago