महाराष्ट्र

सोलापूर मध्ये काँग्रेसचे भाजपविरोधात जोरदार आंदोलन; भारत-अमेरिका करार रद्द करण्याची मागणी

मुंबई: केंद्रातील भारतीय जनता पार्टी (भाजप) सरकारच्या धोरणांविरोधात इंडियन नॅशनल काँग्रेस च्या वतीने आज सोलापूरात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘राहुल गांधीजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा जोरदार घोषणा दिल्या.आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भारत-अमेरिका व्यापार करारावर आक्षेप

भारत-अमेरिका व्यापार करार देशहिताचा नसून त्याचा थेट फटका शेतकरी, व्यापारी, कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. एकतर्फी सवलतींमुळे शेतमालाच्या किमती घसरत असून बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले. हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

धमकी आणि हल्ल्याचा निषेध

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी तसेच पक्षाच्या खासदारांना भाजपशी संबंधित कार्यकर्त्याकडून घरात घुसून गोळ्या घालण्याची उघड धमकी दिल्याच्या घटनेचा आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच पुणे येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचाही निषेध करण्यात आला. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून मुक्त विचार, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि संविधानिक मूल्यांवर केलेला थेट प्रहार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबूराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, पशुपती माशाळ, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, हारुण शेख, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

7 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago