महाराष्ट्र

पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात नवीन बातमी; प्रकाश आंबेडकर

मुंबई: शरद पवार हे जरी देशाच्या राजकारणात दिसत असले, तरी ते भाजपचे हस्तक आहेत. देशपातळीवर खेळणारी माणसे वेगळी आहेत. आणि समोरची माणसे वेगळी आहेत. त्यामुळे लवकरच नवी बातमी समजेल. त्यामुळे देशाच्या राजकारणात कुठली नवी कलाटणी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंढरपूर न्यायालयात आज कोरोना काळातील एका प्रकरणी हजर राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर देखील आरोप करत दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक झाली असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. भाजपला सोडून ते कधीही बाहेर पडू शकत नसल्याचे ते म्हणाले.

सध्या व्हीव्हीपीटी वरून राज्यात पॉलिटिकल पॅरालिसिस झाला आहे. त्यामुळे vvpt शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील; तर बॅलेटवर निवडणुका घ्या. अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि चिन्ह कायम राहील. कारण आयोगाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या वतीने आहे. त्यामुळे आता कोर्ट वेगळा निर्णय घेईल. असे वाटत नाहीत.

मोदींनी मित्र देश गमावले

नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दौऱ्यात भारतीयांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात मित्र देश गमावले आहेत. यातूनच अमेरिकेने भारतावर ७० टक्के टॅरीफ लावण्यात आले आहे. अमेरिकेशी १९० बिलियन डॉलर इतका व्यवहार आहे. यामध्ये ६० बिलियन डॉलरचा व्यवहार टेक्सटाइल आहे. यातच आता टॅरीफ लागल्याने सोलापुरी चादर आणि टॉवेल आता विकल्या जाणार नाहीत. बेरोजगारी वाढेल. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago