उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश
पालघर: डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणी प्रसारमाध्यमांमध्ये २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने व त्यानंतरही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचा व बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच केनाळ बायगुडा व परिसरातील आरोग्य केंद्रांत आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व औषधोपचार तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. यासोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचवले आहे.
“ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे,” असे मत व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…