महाराष्ट्र

शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५०% टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो.

अर्थात, यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात असल्या एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

मागील वर्षी शालेय सहलीसाठी १९६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या. मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपुर्ती रक्कमेसह ) महसूल प्राप्त झाला होता.

यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago