महाराष्ट्र

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार मुकुल वासनिक यांच्यासह खासदार, माजी मंत्री यांचा समावेश

मुंबई: नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.

या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, खा. रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, आ. डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, आ. अमित देशमुख, ऍड, के. सी. पाडवी, खा. वर्षा गायकवाड, आ. अस्लम शेख, आ. डॉ. विश्वजित कदम, एम.एम. शेख, मुजफ्फर हुसेन, रणजित कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, आ. साजीद खान पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, एस सी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

9 मिनिटे ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

11 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

12 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

15 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

15 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

15 तास ago