ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल आज, दि. 11 मे 2025 रोजी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक रुपेश निंबाळकर, अयुब शिकलगार, झहीर खान, शकुंतला राय, बुद्धदास जाधव, अरुण सातपुते, प्रमोदिनी जाधव, श्री.भुजबळ, मानसेवी निदेशक डॉ.प्रकाश ठमके यांच्या सक्रिय पुढाकारातून हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.
मॉक ड्रिलच्या दरम्यान, काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी त्वरित सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या 40 नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आणि त्यांना प्रथमोपचार पुरविण्यात आले. इमारतीत अडकलेल्या 5 जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान, सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने सहभाग घेतला आणि केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
मॉक ड्रिलच्या यशस्वी समारोपानंतर प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले की, हे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण मॉक ड्रिलच्या वेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, तहसिलदार उमेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य अग्निशमन नियंत्रण अधिकारी निलेश झलके, सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसूझा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पोळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एकंदरीत, “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल ठाणे शहरात अत्यंत यशस्वीरित्या पार पडले आणि यातून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची आणि नागरिकांची सज्जता प्रभावी असल्याचे दिसून आले. या संपूर्ण मॉक ड्रिल मध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल , लोढा अमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक या सर्वांनी आपला सहभाग नोंदविला.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…