महाराष्ट्र

प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी

जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ जुनपर्यंत प्रदर्शन

मुंबई: प्रशासकीय अधिकारी म्हणून चोख सेवा बजावताना आपल्या कलागुणांची जपणूक करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ‘ व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स’ या नावाने सुरू असलेले हे चित्र प्रदर्शन २२ जूनपर्यंत पाहता येणार आहे.

प्रशासकीय अधिकारी सौ. निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या अधिकारी असून सध्या त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA), मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या राजस्थानच्या, मारवाड प्रांतातून आलेल्या निधी चौधरी यांचे निसर्गाशी कलेच्या रूपात अनोखे नाते जोडले गेले आहे. ज्या मारवाडमध्ये ३६३ बिष्णोईंनी वृक्षतोड होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी बलिदान दिले, अशा ठिकाणी लहानाच्या मोठ्या झालेल्या निधी चौधरी यांनी निसर्गाचे पावित्र्य आणि पुढे कामाच्या निमित्ताने शहरात आल्यानंतर जाणवलेले निसर्गातील बदल जवळून अनुभवले आहेत. निसर्गप्रति असलेल्या या संवेदना, विशेषतः आपल्याकडच्या वृक्षराजींचे महत्त्व, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या कथा आणि मानवतेशी असलेले त्यांचे नाते याची अभिव्यक्ती त्यांनी ‘ व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स’ या चित्रप्रदर्शनातून केली आहे.

या प्रदर्शनातील चित्रे सेमी-अ‍ॅबस्ट्रॅक्ट शैलीतील असून त्यात भारतीय, ग्रीक, इजिप्शियन अशा प्राचीन संस्कृतींमध्ये झाडांना दिले गेलेले महत्त्व अधोरेखित करतानाच आजच्या काळात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाकडेही त्यांनी या चित्रांमधून लक्ष वेधले आहे. ‘हे माझ्यासाठी केवळ एक कला प्रदर्शन नाही, तर ही एक जनजागृतीची मोहिम आहे. विविध रंगसंगतींमधून आणि प्रतिकात्मक शैलीतून मी प्रेक्षकांना थोडं थांबून निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करू इच्छिते,’ अशा भावना निधी चौधरी यांनी व्यक्त केल्या. प्रशासकीय कौशल्य, हुशारी आणि सर्जशील अभिव्यक्ती यांचा अद्भुत संगम असलेले हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीतील हिरजी आर्ट गॅलरी या दालनात २२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago