आरोग्य

दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो

हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण अनेकांचा असाही समज आहे की, आहारात दररोज अंड्याचा समावेश केल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो.

अनेक रुग्ण त्यांना एक प्रश्न विचारतात की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असल्यास अंडी खाणे फायदेशीर आहे का? यात रुग्णांचा काही दोष नाही, कारण अनेकदा डॉक्टरच रुग्णांना जास्त प्रमाणात अंडी खाऊ नका असा सल्ला देताना दिसतात, ज्यामुळे शरीरात एलडीएल (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन), कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, अशाने ह्रदयविकाराचा धोका वाढतो, अशी भीती असते. अलीकडेच झालेल्या एका संशोधनात अंड्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलवर नेमका काय परिणाम होतो ते सांगण्यात आले आहे.

अंडी हा पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे. आहारात अंड्याचा समावेश केल्याने शरीरास प्रथिने, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात. एका अंड्यामध्ये पिवळ्या बलकमध्ये अंदाजे १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. पण, आहारातील कोलेस्ट्रॉलमुळे तो थेट रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो अशी भीती असते.

पण आता अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांमध्ये अंडीसारख्या कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तप्रवाहातील LDL कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर फारसा प्रभाव पडत नाही. यकृत नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल तयार करते आणि जेव्हा आहारात त्याचे प्रमाण वाढते तेव्हा यकृत स्वतःचे उत्पादन कमी करून नियंत्रणात ठेवते.

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, बहुतेक लोकांच्या शरीरात अंड्यांमधील कोलेस्ट्रॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठा बदल दिसून येत नाही. त्याऐवजी अनुवंशिकता, आहारातील फॅट्सचे प्रकार (विशेषतः ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स) आणि एकूण जीवनशैली यांसारखे घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी ठरवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात.

दररोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो का

अशी शक्यता तर फार कमी असते. अनेक अभ्यासांतून असे सूचित केले जाते की, मध्यम प्रमाणात अंड्याचे सेवन म्हणजे दररोज एका अंड्याचे सेवन करणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात कोणताही मोठा बदल होत नाही, तसेच हृदय व रक्तवाहिन्यांना धोका निर्माण होत नाही. पण, सर्वांच्याच शरीरात असे परिणाम दिसून येतील असेही नाही.

कारण काहींना “हायपर-रिस्पॉन्डर्स” असतात, जे अंड्यांसह आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन करताच त्यांच्या शरीरातील LDL कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. हे मुख्यत्वे अनुवांशिक घटकांमुळे होते, जे शरीर कोलेस्ट्रॉल कसे हाताळते यावर प्रभाव टाकतात. हायपर-रिस्पॉन्डर्स असाल तर LDL कोलेस्ट्रॉलमधील वाढ हृदयविकारासाठी घातक ठरेलच असे नाही. कारण अलीकडील संशोधन असे सूचित करते की, LDL कणांचा आकार, केवळ प्रमाणच नाही तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखमीमध्ये भूमिका बजावते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

8 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

9 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago