महाराष्ट्र

विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी, कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

मुंबई: राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुष्ठरोगाचे लवकर निदान व्हावे, तसेच त्यांना योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, रुग्णांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रलंबित अनुदान तातडीने देण्यात येईल.

सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले, सन 2019-20 मध्ये 16 हजार 531 नवीन कुष्ठ रुग्णांचे निदान होऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे प्राथमिक अवस्थेतील ज्या कुष्ठ रुग्णांचे निदान होवू शकले नाही, असे 17 हजार 14 कुष्ठरुग्ण सन 2022-23 मध्ये विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे जानेवारी 2023 अखेर शोधण्यात आले.

13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आठ कोटी 66 लाख 25 हजार 231 लोकसंख्येची आशा व पुरूष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करण्यात आली. या कालावधीत 6 हजार 731 कुष्ठ रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. यामुळे ज्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे. परंतु त्याची त्यांना जाणीव नव्हती, अशा व्यक्तींचे निदान करण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात कुष्ठरोग निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी सभागृहात दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

10 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

22 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

22 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago