महाराष्ट्र

आमची मुंबई, मराठी मुंबई; लोक चळवळीची गरज

नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या!

“आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

एकनाथ शिंदे : गेम चेंजर आणि किंगमेकर

मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उदय हा केवळ सत्तेचा योगायोग नाही, तर तो मराठी मतदारांशी पुन्हा जोडले गेलेले नाते दर्शवतो. शिवसेनेतील एकेकाळचे दुसऱ्या फळीतील नेते आज मराठी माणसांचे नायक म्हणून पुढे आले आहेत.

लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि आता महानगरपालिका — सलग चौथ्या निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी उंचावत गेली आहे. त्यामुळे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण?” यावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरू आहे.

२९ महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर असली, तरी एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा विजय अपूर्ण आहे, हे वास्तव आहे. मुंबई महापालिकेतही भाजप शिंदे गटाशिवाय महापौर बसवू शकत नाही, ही आजची राजकीय स्थिती आहे.

अमराठी नगरसेवकांचा वाढता प्रभाव : चिंतेचा विषय

या सगळ्या राजकारणात एक गंभीर प्रश्न समोर येतो. मुंबईत अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या आणि त्यांचा प्रभाव.

२०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२७ पैकी मोठ्या प्रमाणात अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचेच ३३ नगरसेवक अमराठी असल्याचे चित्र आहे. याशिवाय काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादीतही अमराठी प्रतिनिधित्व वाढले आहे.

या प्रतिनिधींनी निवडणुका विविध जातीय, धार्मिक व प्रादेशिक समीकरणांवर जिंकल्या असतील. पण ते मूळ मुंबईकरांचे हित जपतील का? हा प्रश्न आज सामान्य मराठी माणसाच्या मनात आहे.

मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी अस्तित्व

मराठी शाळा वाचवण्याचा प्रश्न गंभीर आहेच. त्यातच त्रिभाषा सूत्राअंतर्गत हिंदी सक्तीचा केलेला प्रयत्न लोकचळवळीमुळे थांबवावा लागला, हे लक्षात घ्यावे लागेल. मुंबई आणि महाराष्ट्रात परप्रांतीयांचे वाढते आक्रमण आणि ताकद दाखवण्याचे प्रयत्न यावर गाव ते शहर पातळीवर संघटित जागरुकता आवश्यक आहे.

महापौर पद आणि राजकीय घोषणा

भाजप : हिंदू महापौर

एमआयएम : बुरखाधारी महिला महापौर

शिवसेना (उबाठा)-मनसे : मराठी माणूस महापौर

प्रत्येक पक्ष आपापल्या राजकीय भूमिकेनुसार घोषणा देत आहे. मात्र या सगळ्यात मूळ मुंबईकर अस्वस्थ आहे, कारण मुंबईची जमीन, मोक्याच्या जागा आणि आर्थिक ताकद हळूहळू अमराठी धनदांडग्यांच्या हाती जात असल्याची भावना बळावत आहे.

शिवसेनेकडून अपेक्षा वाढल्या

शिवसेनेतील दुफळी काहीही असो, मुंबईच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने वेगाने आणि थेट मराठी माणसांशी संवाद साधत आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाही मुंबईकरांसाठी मोठा वाटा असायला हवा, असा कौल मराठी मतदारांनी दिला आहे.

निष्कर्ष

वाद थांबवा.

अहंकार बाजूला ठेवा.

मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या.

तेव्हा “आमची मुंबई, मराठी मुंबई” ही केवळ घोषणा न राहता लोकचळवळ बनेल.

आणि येऊ घातलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हीच समस्त मुंबईकरांची अपेक्षा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

45 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

49 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

53 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago