महाराष्ट्र

विक्रोळीत अवयवदान जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिघांनी भरले अवयवदान संकल्पपत्र

मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा विक्रोळी शाखा आणि तक्षशील बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अवयवदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया आणि प्रत्यारोपण व्यवस्थेची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

लाईव्ह बियॉन्ड लाईफ संस्थेचे मिलिंद कनगुटकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. कुरेश मस्कती आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा मुंबई महापालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मोहिते यांनी राष्ट्रीय (NOTTO), राज्य (SOTTO), प्रादेशिक (ROTTO) तसेच विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

कार्यक्रमात विक्रोळी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव, सायन रुग्णालयाचे सह-अधिष्ठाता डॉ. अनिल मोरे, डॉ. सुरेंद्र तांबे, डॉ. चंद्रसेन कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिल जाधव यांनी केले.

उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी तीन श्रोत्यांनी अवयवदान संकल्पपत्र भरून अवयवदान चळवळीला प्रत्यक्ष पाठिंबा दिला. जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago