मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ असतील.
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रावरील संकट, कंत्राटी नोकरभरती, नोटबंदी व जीएसटीचा कृषी आणि उत्पादन क्षेत्रावर झालेला परिणाम, बँकिंग व विमा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच वित्तीय क्षेत्राच्या परदेशीकरणासारख्या गंभीर आर्थिक मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…