महाराष्ट्र

‘आई’ पर्यटन योजनेला पुणे विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; १,७०० हून अधिक महिलांचे अर्ज

पुणे: पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजिकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, पुणे विभागातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माहितीनुसार, राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ४ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,७०० हून अधिक अर्ज एकट्या पुणे विभागातून आले आहेत. म्हणजेच राज्यातील एकूण अर्जांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अर्ज पुणे विभागातील महिलांनी केले आहेत.

महिलांनी पर्यटन क्षेत्रात केवळ नोकरी न करता स्वतःचे उद्योग उभारावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने २०२३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत हॉटेल, होम-स्टे, ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट तसेच पर्यटनाशी संबंधित स्टार्टअप सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जावरील संपूर्ण व्याजाचा भार राज्य सरकार उचलत असल्याने लाभार्थींना हे कर्ज बिनव्याजी मिळते.

योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यासोबतच महिलांना ‘टुरिस्ट गाईड’ म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय वाढविणे, तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे महिलांसाठी अधिक सुलभ होत आहे.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील महिलांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. या भागातील ऐतिहासिक वारसा, गड-किल्ले आणि निसर्ग पर्यटनामुळे पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने महिलांचा या योजनेकडे विशेष कल दिसून येत आहे.

दरम्यान, कर्ज मंजूर होत असले तरी सरकारकडून व्याज परताव्याची रक्कम वेळेत जमा होत नसल्याची तक्रार लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे व्याज परतावा नियमित आणि वेळेत मिळावा, अशी मागणी महिला उद्योजिकांनी केली आहे.

पर्यटन संचालनालय, पुणे यांनी सांगितले की, ‘आई’ पर्यटन योजनेमुळे महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय उभारण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळत असून, पुणे विभागातील महिलांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

9 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

9 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

9 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

10 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

10 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

20 तास ago