महाराष्ट्र

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री वामनराव नाईक यांच्या नात गितांजली नाईक यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजप शिक्षक आघाडी तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, कल्याणचे अध्यक्ष विकास मुकुंदराव पाटील यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले.

यावेळी CWC सदस्य व राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिस्ती, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, धीरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल सोनावणे, प्रवीणकुमार शेप आदी उपस्थित होते.

‘पडीक जमीन कसल्याशिवाय सोडू नका’

पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. बीडसह ज्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस संघटनेची ताकद कमी आहे, त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“पडीक जमीन कसण्याचे प्रयत्न शेतकरी कधीच सोडून देत नाही. जमीन सुपीक होईपर्यंत तो तिची मशागत करत राहतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे, तेथे जोमाने काम करा आणि संघटनेची ताकद वाढवा,” असे प्रसाद म्हणाले.

लोकशाही आणि संविधानाचे रक्षण तसेच सर्वसामान्य जनतेचे मूलभूत हक्क व अधिकार कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला बळकट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. “केंद्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करायचे आहेत. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे ८८२ दिवस आहेत. जोमाने काम करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

‘गावागावात काँग्रेसचा विचार पोहोचवा’

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावेळी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरएसएस-भाजपचा अजेंडा समाजात फुट आणि भेदाभेद निर्माण करण्याचा आहे. हा कथित अजेंडा तरुणाईनेही ओळखला असल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेसला मोठा इतिहास असून काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो, असा दावा करत “गावागावात काँग्रेसचा विचार पोहोचवा,” असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले. बीड जिल्ह्यासह खान्देशातील आजच्या पक्षप्रवेशामुळे या भागात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

4 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

4 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

4 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

5 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

15 तास ago

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

2 दिवस ago