grampanchayat
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी माजी सरपंच आणि युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर माजी सरपंचाने युवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी माजी सरपंचासह तिघांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
जारगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना गावातील एका युवकाने धूर फवारणी यंत्राच्या वापराबाबत आणि त्याच्या कारभाराबाबत प्रशासनाला जाब विचारला. युवकाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे ग्रामसभेत वातावरण तापले. याच मुद्द्यावरून माजी सरपंच आणि संबंधित युवक यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि माजी सरपंचाने युवकाला मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे.
ग्रामसभेत झालेली ही मारहाण आणि गदारोळ तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित तरुणाने तात्काळ पाचोरा पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी माजी सरपंचासह अन्य तिघांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…