महाराष्ट्र

राज्यात अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय, हे धाडस कुठून येत

मुंबई: महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत चर्चा सुरू करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधीमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ल चढवला. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लोकांना दिलेल्या अन्य प्रलोभनांबाबत एक चकार सुद्धा मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणात नव्हता. दावोस मधून किती गुंतवणूक येणार आणि किती रोजगार उपलब्ध होणार हे मात्र दरवेळीप्रमाणे नमूद केले. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सुमारे ५० लाख तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित होते. ते फारसे दिसत नाही उलट बेरोजगारीच प्रचंड वाढली आहे असे मत त्यांनी मांडले.

उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन नको तर स्थानिक गुंडांकडून संरक्षण द्या ही उद्योजकांची मागणी आहे. ही संघटित गुंडगिरी इतकी बळावली आहे की छोट्या दुकानदारापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना खंडणी द्यावी लागते. निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असा सल्ला देत असताना सरकारचे काम आता झाले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ही मतदारांची फसवणूक आहे. देशाच्या स्थूल उत्पादनातील महाराष्ट्राचे योगदान १.२% खाली आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमी ॲडव्हायजरी कमिटीच्या अहवालानुसार आपण गुजरातच्या तुलनेने बरेच मागे गेलो आहोत अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी व्हावी. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने नवीन वीज कनेक्शन देणारे पोर्टलच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पंपाची मागणीच करता येत नाही. ते पोर्टल पुनश्च सुरू करा अशी मागणी करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा इतिहास सांगितला तसेच संतांचे विचार सांगितले. सध्या राज्यातील परिस्थिती लक्षात घेता समतेचा संदेश देणाऱ्या या भूमीत खरंच पुरोगामित्व शिल्लक आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago