महाराष्ट्र

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात छायाचित्र प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन

ठाणे: जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने ठाण्यात एक खास छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया आणि शटर अँड लाईट क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

हे प्रदर्शन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल गांगुर्डे यांच्या निवडक छायाचित्रांचे असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर त्यांनी क्लिक केलेली उत्कृष्ट छायाचित्रे पाहता येतील. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सुमन शिवाजी सानप आणि पर्यावरण अभ्यासक तथा वृक्षपुरुष विजयकुमार कट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन दि.19 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, टेरेस गार्डन, एसबीआय बँकेच्या वर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, ठाणे (पश्चिम) या ठिकाणी नागरिकांसाठी आणि छायाचित्रप्रेमींसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

या उपक्रमाच्या निमित्ताने वृत्तपत्र छायाचित्रकारांचा सत्कार आणि कार्यशाळेचे ही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात, ठाणे शहरात गेल्या 15 वर्षांपासून वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेल्या छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय, शुक्रवार, दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता ‘छायाचित्रणाचे तंत्र आणि माहिती’ या विषयावर एक मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘शटर अँड लाईट क्रिएशन्स’ च्या माध्यमातून ही कार्यशाळा होईल. यात छायाचित्रणाचे मूलभूत तंत्र शिकायला मिळेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक गुगल फॉर्म लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.  या प्रदर्शनाला आणि कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिक, आणि छायाचित्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

2 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

5 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

5 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

5 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

6 तास ago