मुख्य बातम्या

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी (दि. १७) पहाटे मालवाहू ट्रकला टेम्पोने जोरदार दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 3८), शांताबाई मकाजी वाजे (वय ६८) व मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर वाजे हे आई व लहान मुलासह मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गावाकडे येत होते. कवठे येमाई येथील काळूबाई नगरजवळील बंटी हॉटेलजवळ मालवाहू ट्रकवर (क्र. एम एच ४२ बी ८८६६) दुध वाहतूक करणारा टँकर (क्रमांक एम एच १६ सीडी ९८१९ ) जोरदार आदळला. धडक एवढी भीषण होती की टँकर ट्रकमध्ये घुसला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. मात्र लहानगा युवांश जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी शांताबाई व ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात वाजे कुटुंबातील तीन जणांचा करुण अंत झाल्याने वडनेर गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला आहे. अष्टविनायक महामार्ग सततच्या अपघातांमुळे ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असून धोकादायक वळणांवर चेतावणी फलक व शास्त्रीय गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago