महाराष्ट्र

अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा

मुंबई: दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्या वर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज के.ई.एम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की, दुदैवाने दहिहंडी उत्सवात जोखिम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. गेली २९ वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

सध्या दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपये पर्यंत मदत दिली जाते. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे ९५ गोविंदांच्या वर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यापैकी अनेक गोविंदां वर यशस्वी उपचार करुन सूखरुप घरी सोडण्यासाठी दहिहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांचे देखील कौतुक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

आज ७ गोविंदा खेळाडू हे के.ई.एम. रुग्णालय मध्ये हस्तिरोग तज्ञ डॉ. मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले ” अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदाचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही. उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये, आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू.

गोविंदांचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे.

प्रताप सरनाईक 

मंत्री परिवहन 

यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे बाळा पडेलकर व इतर सदस्य यांच्या सह के.ई.एम. रुग्णालयाचे डॉ. हसमुख रावत डॉ.प्रवीण बांगर हे उपस्थित होते.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा. मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

17 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

17 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

17 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

17 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

22 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

22 तास ago