महाराष्ट्र

प्रोफेसर बनून 3 Idiots मध्ये ठसा उमटवणारे अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

मुंबई: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्यातून कोणी सावरलं नव्हतं तोवर आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले आहे.

वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत काम केले. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 मध्ये चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ आपले अभिनय कौशल्य दाखवले.

125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल

अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘हम साथ साथ है’, भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या सिनेमांमध्ये ते दिसले. आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ मध्ये त्यांनी प्राध्यापकाची भूमिका केली होती.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारुन अच्युत पोतदार यांनी घराघरात स्वतःचे नाव कमावले. या चित्रपटातील ‘क्या बात है’ आणि ‘कहना क्या चाहते हो?’ सारखे त्यांचे डायलॉग इतके सुपरहिट झाले की त्यांचे सतत मीम व्हायरल होत असतात.

अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही केलेले काम

चित्रपटांव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली. त्यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘भारत की खोज’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयातून टीव्ही आणि सिनेमांमध्ये खूप नाव कमावले. अच्युत पोतदार यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान खूप मोठे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

20 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

20 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

20 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

20 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

20 तास ago