ठाणे: महसूल विभागातील गट “क” संवर्गातील तलाठी भरती परीक्षा- 2023 दि. 17 ऑगस्ट ते 14 स्प्टेंबर 2023 पर्यंत 19 दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०२ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणे, परिक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करुन परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, ही दुकाने वा त्यांच्या सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन वापर करण्यास मनाई आदेश करण्यात आली आहे.
विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, तसेच परीक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी/ कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्याखेरीज अन्य व्यक्तींना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर “महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिर्व्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ॲक्ट १९८२ मधील तरतूदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. हे आदेश (दि. 17) ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत अंमलात राहतील, असे ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…