महाराष्ट्र

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी जाहीरपणे माफी मागितली असली, तरी पीडित आईने ती ठामपणे नाकारत न्यायाची मागणी केली आहे.

“हात जोडून माफी मागतो”; वडिलांचा पश्चात्ताप

आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी आपली चूक मान्य केली.“माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वकिलांमार्फत पीडित कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्या आईसमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही. न्यायालय जो आदेश देईल तो मला मान्य आहे. त्यांच्या दुःखाची भरपाई मी करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.

“माफीने माझा मुलगा परत येईल का?” – आईचा काळजाला भिडणारा प्रश्न

साहिलची आई इन्ना माकन यांनी आरोपीच्या वडिलांची माफी फेटाळून लावत तीव्र प्रतिक्रिया दिली.“कशासाठी माफी? माझं आयुष्य संपवल्याबद्दल की प्रकरण मीडियात आलं म्हणून? माफ करा, पण मी तुमची माफी स्वीकारू शकत नाही. जर हाच अपघात तुमच्या मुलासोबत झाला असता, तर तुम्ही माफी दिली असती का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “आता माझ्यासाठी ना सकाळ उरली आहे ना संध्याकाळ. कामावर जाण्याचं किंवा झोपेतून उठण्याचं कारण उरलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता माफी मागून काय उपयोग?”

नेमकं काय घडलं?

३ फेब्रुवारी रोजी द्वारका परिसरात रील बनवण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची स्कॉर्पियो भरधाव वेगात चालवत साहिल धनेश्रा यांना धडक दिली. या अपघातात साहिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आरोपीचे वडील व्यवसायानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलाला वाहनाची चावी देणे, तसेच त्याच्या स्टंटबाजीकडे दुर्लक्ष करणे या पालकांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.

न्यायाची प्रतीक्षा

या प्रकरणात अल्पवयीन आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, पालकांची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीडित कुटुंब न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवून कठोर शिक्षेची मागणी करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago