राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुंबई: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, यासाठी प्रत्येक विद्यापींठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षानिवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी,तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उच्च शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यापीठ रँकिंगची सद्या असलेली स्थिती याचे आत्मपरीक्षण करून राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय पातळीवर विद्यापींठाचे रँकिंग वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा आणि कालबद्ध नियोजन करावे. या कृती आराखड्याला अधिक गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करावा यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
जागतिक स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. खाजगी विद्यापीठे वेगाने पुढे येत आहेत, त्यामुळे सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे.असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टे, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची NIRF रँकिंग सुधारणा,शैक्षणिक सुविधा संदर्भात विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, यांनी सादरीकरण केले.
बैठकीत खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
NIRF रँकिंग मध्ये सार्वजनिक विद्यापींठाची क्रमवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे
महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान स्थान बनवणेः राज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि NRI व परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे
उच्च-TRL (Technology Readiness Level) संशोधन आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे
महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे
अभ्यासक्रमांना भावी रोजगार बाजारातील कौशल्ये आणि ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे
जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे.
शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…
पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…
थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…