महाराष्ट्र

दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: ‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘पँथर’ या दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

​मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी ‘दलित पँथर’च्या या विशेषांकाचे संपादन केले आहे. नुकतेच या विशेषांकाचे प्रकाशन मातोश्री येथे मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मा. सुभाष देसाई, सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी लेखक, दलित पँथरचे एक संस्थापक अर्जुन डांगळे, परिवर्तनाचा वाटसरूचे संपादक अभय कांता, फुले आंबेडकरी वाङमयकोशाचे संपादक डॉ. महेंद्र भवरे, ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, चित्रकार प्रकाश भिसे, डॉ. विजय पट्टेबहादूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या विशेषांकामध्ये दलित पँथर चळवळीचा आढावा, पँथर्सचे स्वकथन, पँथर्स विषयी स्मरण लेख, मुलाखती, तसेच पँथर्स विषयीच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. पँथरकडे जुनी पिढी, बुद्धीजीवी, आजची तरुणाई कोणत्या दृष्टीकोनातून पाहते याचाही वेध या अंकात घेण्यात आला आहे. सोबतच पँथर्सचे काही दुर्मिळ दस्तऐवज या विशेषांकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

12 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

12 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

12 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

12 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

12 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

12 तास ago