महाराष्ट्र

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून इथे जवळपास ३५० स्टॉल लागले आहेत. मात्र या स्टॉल धारकांना सोयी सुविधा देखील आयोजकांनी पुरवल्या नाहीत त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलना दोन कोटीचे अनुदान दिले आहे. इथे जवळपास ३५० स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलसाठी आयोजकांनी ७००० रुपये भाडे घेतले आहे. एवढे पैसे घेऊनही पुरेशा सुविधा स्टॉलधारकांना देता येत नसतील तर साहित्य संमेलन आयोजन करण्यात काय अर्थ आहे असा सवाल प्रकाशात करत आहेत.

राज्यातील काही नामांकित प्रकाशकांनी सांगितले की आयोजकांनी स्टॉल साठी तीन दिवसाचे ७०००₹ भाडे घेतले, त्यात एका व्यक्तीची होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करु असे सांगितले होते. मात्र अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. आम्ही सध्या स्वखर्चाने राहतात, तसेच पाण्याची सोय नाही पुरेशी शौचालयाची व्यवस्था नाही. इतक्या स्टॉल्सवर फक्त ६ शौचालय आहेत. जे लोक स्टॉलवर राहत आहेत त्यांना रात्री डासांचा प्रचंड त्रास होत आहे. संध्याकाळी 7 नंतर स्टॉलवर बसणे देखील अशक्य होत आहे.

पंखा नाही इतर सोयी नाहीत…

अनेकांचा खर्च देखील निघालेला नाही. साहित्य संमेलनाला लोकांची गर्दी देखील खूपच कमी आहे स्थानिक लोक हिंदी भाषेत बोलणारे जास्त आहेत त्यामुळे पुस्तक विक्रीला अतिशय थंड प्रतिसाद मिळतोत. तीन दिवसांच्या संमेलनात काल शुक्रवारी काही स्टॉलधारकांची बोहणीही झाली नव्हती.

काही नामांकित प्रकाशकानी दहा ते पंधरा स्टॉल घेतले आहेत आणि हे लोक बसून आहे. एकाच प्रकाशकाने सांगितले की, दोन दिवसात १५०० रुपयाची देखील पुस्तक विक्री झाली नाही, नाशिक जळगाव पुणे मुंबई येथून येण्याजाण्याचा राहण्याचा जवळपास 15 हजार रुपये खर्च आहे. मात्र पुस्तक विक्रीला सुद्धा हवा तसा प्रतिसाद नाही.

आतापर्यंत ९५ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडली मात्र अनेक प्रकाशक आणि विक्रेते देखील आवाज करत नसल्याने सगळ घडत. प्रकाशक, विक्रेत्यांनी आवाज उठवला असता तर आयोजकांनी काहीतरी व्यवस्था केली असती. दरवर्षी पाण्याचा ,राहण्याचा अशाच समस्या येत असतील तर त्याला काही अर्थ नाही. इतके पैसे घेतले जात असतील तर किमान स्थानिक ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदी करायला पाहिजे ना! कदाचित उद्या सकाळपासून प्रकाशक परत फिरण्याची देखील शक्यता आहे, असे मराठवाड्यातील एका मोठ्या प्रकाशकाने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

5 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

5 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

5 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

5 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

5 तास ago