डॉ. नीलम गोऱ्हेंकडून उमेदवारांच्या कचेऱ्यांना भेटी; मतदान दिनी विशेष काळजीचे आवाहन
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेने प्रचाराचा जोर वाढवला आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (दि. १२) पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विविध प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्यांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मतदान दिवशी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. “आधी मतदान, मग संक्रांतीचे वाण” या धोरणावर भर देत मतदारांना वेळेत मतपत्रिका मिळतील, याची खात्री करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लग्नकार्य, समारंभ किंवा बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची आगाऊ नोंद घेऊन त्यांचे मतदान सुनिश्चित करण्यासाठी शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांना लिहिलेले पत्रक प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे प्रकाश ढमढेरे, संदीप शिंदे, तसेच अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फुलवला चौक येथील आंबा माता व कालिका माता मंदिरात दर्शन घेत शिवसेनेला निवडणुकीत घवघवीत यश मिळावे, यासाठी देवीकडे प्रार्थना केली.
या प्रभागांतील उमेदवारांच्या कचेऱ्यांना भेटी
प्रभाग २३ (रविवार पेठ – नाना पेठ):
प्रदीप अवचिते, प्रतिभा धंगेकर, डॉ. वैष्णवी किराड, गणेश नलावडे
प्रभाग २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – KEM हॉस्पिटल):
प्रदीप अफूवाले, किशोर तरवडे, प्रशांत मते, प्रणव धंगेकर
प्रभाग २५ (शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई):
अक्षता धुमाळ, सिद्धेश कामठे
प्रभाग २६ (घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभूमी):
सिद्धेश्वर जाधव, शीतल आंदेकर, वंदना जेधे, आबाजी साकीब
प्रभाग ३६ (सहकारनगर – पद्मावती):
मच्छिंद्र ढवळे, पूनम परदेशी, नयना लगस, उल्हास (आबा) बागुल
प्रभाग ३७ (धनकवडी – कात्रज डेअरी):
सागर बारणे, सुलक्ष्मी धनकवडे, मोहिनी देवकर, गिरीराज सावंत
प्रभाग ३८ (बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज):
वनिता जांभळे, अनिल कोंढरे, संध्या बर्गे, प्राजक्ता लिपाणे, स्वराज बाबर
१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या पुणे महापालिका मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा प्रचार दौरा पक्षासाठी बळ देणारा ठरत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त मतदान घडवून आणून शिवसेनेला यश मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…