महाराष्ट्र

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर…

मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी आज विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे, यावर बोलताना पहिल्यापेक्षा पाचपट संख्येनं अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होईल, हा मोर्चा अंतरवाली सराटी मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण मार्गे मुंबईत धडकणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे की “मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे.

कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावेत असं होतं. पण ते कशासाठी म्हणत होते? माहिती नाही. दोन भावांनी एकत्र यावं, वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू द्या, पण लोकांची इच्छा आहे ना, दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं, त्यात आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत, मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे, आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago