महाराष्ट्र

बोगस लाभार्थ्यांकडून होणार वसुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकारावरून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचे फर्मान अन् योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचे फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, घोटाळे करणारे कोण? असा सवाल केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या छाननीत तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. यात काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची गंभीर बाब समोर आली. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करा, त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणांत पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आदिती तटकरेंचा इशारा

या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत असताना या योजनेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. तसेच चुकीचे प्रकार थांबवण्यासाठी विभाग किंवा शासन योग्य ते पाऊल उचलत आहे. चुकीच्या लाभार्थ्यांनी शासनाची दिशाभूल केलेली असल्‍यास ती रक्कम वसूल करण्याबाबत शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

5 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

23 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago