महाराष्ट्र

सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा

याचा चौकशी अहवाल अधिवेशन संपण्याच्या आत सभागृह समोर मांडण्यात यावा

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत चाळीस लाखाच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅन मधील यंत्र ही बारा लाखाच्या किंमतीपेक्षा अधिक नाही. अस असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली आहेर. कॅन्सर सारखा जीवघेणा आजार आहे त्याच्या संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्र बंद पण पडली आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे याबाबत चौकशी सुरू आहे अजून अहवाल देखील आला नाही मग नेमकी काय सुरू आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृह समोर मांडला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदना समोर मांडण्याचे निर्देश दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

9 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

9 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

9 तास ago