महाराष्ट्र

या वर्षीपासून इयत्ता चौथी, पाचवी, सातवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार शिष्यवृत्तीची परीक्षा

सोलापूर: चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

आतापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, २०१६ पासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे. या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चालली आहे. यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाइन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षणमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारीही उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवीसाठी सुरू करावी, अशी एकमुखी आग्रही मागणी केली. त्यास शिक्षण आयुक्तांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला. तसेच शिक्षणमंत्री भुसे यांनीही अनुकूलता दर्शवली. त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी व आठवीसाठी घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार असून त्यासाठी शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे. परिणामी पटसंख्या घटत चालले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळांत दाखल करत नाहीत. ही बाब सर्वच शिक्षक संघटनांनी प्रशासनासह शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.

नीलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

8 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago