महाराष्ट्र

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने धारदार चॉपरने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संबंधित दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून दुसऱ्या विद्यार्थ्याने अयोध्या नगर परिसरातील एका शाळेजवळ पीडित विद्यार्थ्याला गाठले आणि त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी विद्यार्थी कुसुंबा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी GMC रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आपल्या मुलावर हल्ला करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची परिस्थिती याबाबत माहिती घेतली जात आहे. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पुढील कारवाई संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसार केली जाणार आहे.शाळेच्या परिसरातच विद्यार्थ्यांमधील वादाने एवढे गंभीर रूप घेतल्याने पालक आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago