राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची विधानसभेत मागणी
मुंबई: वाळवा तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसान भरपाईबाबत कोणताही विचार होत नाही त्यामुळे सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून वाळवा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली.
याबाबत विस्तृत माहिती देताना जयंतराव पाटील म्हणाले की, २०२३-२४ साली ऐन पिक छाटणी घेतलेली असताना माझ्या वाळवा आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास २५० हेक्टर बाग बाधित झाली आहे. शासनाने याचे पंचनामे तर केले पण अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. यंदाही मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने द्राक्षबागांची काडीच तयार झाली नाही. त्यामुळे यंदा हजारो एकर द्राक्ष बागांना घड पडणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे असे ते म्हणाले.हा गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शासनाला मागणी केली की यात लक्ष घालून मागील नुकसान भरपाई तर द्यावीच त्याशिवाय यंदाचे ही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…