महाराष्ट्र

शासन दरबारी मच्छीमार बांधवांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शिजतय का…

छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर खरा अधिकार मच्छीमार बांधवांचाच

मुंबई: कोळी समाज हा या मुंबईचा मुळ भूमिपुत्र असलेला समाज असताना देखील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतून मच्छीमारांचे स्थलांतर करुन हा भूखंड विकासकाच्या घशात घातला गेला, असा आरोप करत मच्छीमार बांधवांना मुंबईतून उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शासन दरबारी शिजत आहे का..? असा संतप्त सवाल आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत उपस्थित केला.

शेख म्हणाले, मुळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या मासळी मंडईंच्या परवानग्या रद्द केल्या जात आहेत. सुमारे ५० वर्षांपासून पासून मासळी व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईत दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी संपूर्ण कोकण किनारपट्टीपासून वसई, वर्सोवा, रायगड, रत्नागिरी ते मालवणपर्यंतचे मासळी उत्पादक विक्रीसाठी येतात.

हा भूखंड कोळी समाजाने ४०० कोटी रुपयात ३० वर्षांच्या भाडे करारावर घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र तरीही या भूखंडाचे आरक्षण रद्द करून ‘आवा डेव्हलपर’ या कंपनीला ३० वर्षांसाठी ३६९ कोटी रुपयांना आणि पुढील ३० वर्षांसाठी केवळ १ ते १००१ रुपयांमध्ये भाडेपट्ट्यावर दिल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.जर मच्छीमार संस्था विकासकापेक्षा ५० कोटी जास्त देऊन आपली मंडई वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हा भूखंड बिल्डरच्या घशात का घातला जातोय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सागरी हद्दीत परराज्यातील ट्रॉलर्स करत असलेल्या अनधिकृत मासेमारीचाही मुद्दा उपस्थित केला. गस्ती नौका नसल्याने मासेमारी बंदी काळातही परराज्यातील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत हैदोस घालत आहेत. हे असेच चालू राहिल्यास शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमार बांधवांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल, असंही शेख शेवटी म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

13 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

1 दिवस ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

1 दिवस ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago