महाराष्ट्र

शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटीत दाखल

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेली सुनेत्रा पवार यांची आज दुपारी पवार परिवाराचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीसाठी आधी आमदार रोहित पवार पोहोचले होते. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेतल्यावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहयोग सोसायटी परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

शरद पवार यांनी सर्वप्रथम दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला वंदन केले. या वेळी रोहित पवार, जय पवार आणि पवार कुटुंबाचे इतर सदस्य उपस्थित होते. भेटीदरम्यान शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात पक्ष आणि जनसेवेच्या बाबतीत चर्चा झाली की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर हा आठवा दिवस असून, संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाचे नेतृत्व आणि जनसेवा यांची मोठी जबाबदारी आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago