ठाणे: देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केले. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू करत असल्याचे सांगत शिंदे यांनी आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला. आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाताना त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. तसेच सुरक्षा रक्षकांची वाहने वगळता ताफ्यातील अन्य वाहनांची संख्या कमी करण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून इंधन बचतीवर भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने संयमित पद्धतीने इंधनाचा वापर केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचा उल्लेख करत मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांनी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहन करत काँग्रेस नेते यांच्यावर टीका केली. “देशातील जनता सुज्ञ आहे. ‘हे पब्लिक है, सब जानती है’. त्यामुळे सरकारच्या आवाहनाला सर्वांनी साथ द्यावी,” असे ते म्हणाले.
“मोदीजी नेहमी ‘नेशन फर्स्ट’ या विचाराने निर्णय घेतात. त्यामुळे मी स्वतः इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांनाही ईव्ही वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यांनीदेखील राज्य सरकार पंतप्रधानांच्या आवाहनाला पूर्ण क्षमतेने प्रतिसाद देत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. युद्धजन्य परिस्थितीचा कमीत कमी फटका नागरिकांना बसावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री यांनी आपला कौटुंबिक युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नगरविकास विभागाच्या डेन्मार्क दौऱ्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनीही काटकसरीच्या निर्णयांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…