महाराष्ट्र

चेंबूर बस दुर्घटनेची शिंदेंकडून गंभीर दखल; जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांच्या सूचना

मुंबई: चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोघेही घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांना त्यांच्या उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये आणि प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी होणे आवश्यक असल्याचे नमूद करत शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी संबंधित झाडांची छाटणी झाली होती का, याची चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले जातील.

दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेही शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चानंतर त्यांनी विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडल्या.

यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे लाभ आणि इतर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि सर्व समाजांना न्याय मिळेल, ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, या विषयावर सुमारे २५ आमदारांनीही त्यांची भेट घेतल्याचे सांगत, उद्याच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. चर्चेच्या माध्यमातूनच कोणताही प्रश्न सोडवला जाईल आणि न्याय्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

3 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

18 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago