महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करणारः गणेश काळे

धाराशिव : माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे व डिसेंट फाउंडेशन, पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने आपलं घर (नळदुर्ग) येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावचे सुपुत्र आणि माजी विद्यार्थी मंडळ विद्यार्थी साहाय्यक समिती पुणेचे अध्यक्ष गणेश बबनराव काळे यांनी आपलं घर मधून दहावी चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या किमान पाच ते दहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वाशीत केले आहे.

यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश बबनराव काळे, डिसेंट फाउंडेशन, पुणेचे महेंद्र बिडवई, बालाजी शिंदे, गणेश पाटीलबा काळे, सुनील चोरे, संभाजी सातपुते, संदीप इंगवले, प्रशांत आवटे, सत्तार शेख, विलास नांगडे, तुषार मोहन, तसेच राष्ट्रसेवा दलाच्या संस्थेतील पदाधिकारी होळे सर आणि जगताप सर तसेच आपले घर चे माजी विद्यार्थी सुहास गोरे, सतीश चव्हाण व गुंडू पवार, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

गरजवंत विद्यार्थी वर्ग शोधून त्याला शिक्षणात सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. अशाच उपक्रमातून सामाजिक स्वास्थ्य सुधारते. माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे यांनी आपलं घर (नळदुर्ग) येथील चिमुकल्यांना केलेली शैक्षणिक मदत सामाजिक सलोखा निर्माण करेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते तथा आपलं घर संस्थेचे संस्थापक पन्नालाल भाऊ सुराणा यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात 1993 मध्ये मोठा भूकंप झाला होता. त्या भूकंपामध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आपलं घर ही संस्था काम करीत आहे. गेल्या एकतीस वर्षापासून या संस्थेच्या शाळेत अनाथ, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच त्यांना मोफत जेवण व निवासा बरोबर शैक्षणिक सुविधाही दिल्या जातात. आपलं घर संस्थेचा हा अनोखा उपक्रम पाहून पुणे येथील माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती व डिसेंट फाउंडेशनने या संस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, सॅंडल, वह्या, पेन, पुस्तक, कंपास बॉक्स अशा विविध शैक्षणिक वस्तू व ८०० किलो गहू मोफत देण्यात आला. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने वारंवार अशा होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.

मंडळाचे सदस्य गणेश पाटीलबा काळे यांनी मुलांना समजेल अश्या साध्या भाषेत गप्पा वजा भाषण केले, सुनील चोरे यांनी मुलांच्या भविष्याविषयी मार्गदर्शन केले, आपलं घरच्या आठवणींना उजाळा देतेवेळी बालाजी शिंदे यांचा कंठ दाटून आला होता. प्रवीण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात, या बाबींचा उलगडा यावेळी मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांनी केला. माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष गणेश बबनराव काळे यांनी आपलं घर मधून दहावी चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या किमान पाच ते दहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वाशीत केले आहे. आपलं घर चे विलास वकील यांनी प्रस्ताविक केले तर बालगृहाचे अधीक्षक संदीप चवले यांनी सूत्रसंचालन करून सरिता उपासे यांनी आभार मानले. अंधार फार झाला, पणती जपून ठेवा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

4 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

4 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

9 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

9 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

9 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

9 तास ago