आरोग्य

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

पावसाळ्यात गरमा गरम चहा अनेकजण पित असतात. बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार आले असतील तरी दुधाचा चहा पिणं ही अनेकांची सवय आहे. जास्तीत जास्त लोक दुधाचा चहा घेतात. तसा तर चहा कोणत्याही ऋतूमध्ये लोक न विसरता पितात. मात्र, पावसाळा आला की, लोक जास्त चहा पितात. म्हणजे पावसाच्या रिमझिम धारा आणि गरमागरम चहा हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडतं. पण एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्या काय ते जाणून घेऊयात…

पचनासंबंधी समस्या
पावसाळ्यात दुधाचा चहा जास्त प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात. पावसाळ्यात आधीच पचन तंत्र कमजोर झालेलं असतं. अशात जर तुम्ही जास्त चहा घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या आहे त्यांना तर दुधाचा चहा अजिबात न पिण्याचा सल्ला दिला जातो.

हाडं कमजोर होतात
दुधाच्या चहामध्ये टॅनिन आणि कॅफीन भरपूर असतं जे शरीरात कॅल्शिअमच्या अवशोषणात अडथळा आणतात. याचा हाडांवर प्रभाव पडतो. जास्त चहा घेतल्याने हाडे कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढतो.

झोप खराब होते
चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं जे पचन तंत्र बिघडवतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने झोप न येण्याची किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. खासकरून रात्री चहा प्यायल्याने झोप खराब होते. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो.

दात खराब होतात
दुधाच्या चहामध्ये असलेली साखर दातांसाठी नुकसानकारक ठरू शकते. चहा जास्त प्यायल्याने दातांना किट लागते आणि त्यावर पिवळा थर जमा होतो. त्याशिवाय चहामधील टॅनिनमुळे दातांवर पिवळे डाग येतात.

वजन वाढतं
पावसाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. अशात दूध आणि साखरेचा चहा सेवन केल्याने कॅलरी जास्त मिळतात. त्यामुळे या दिवसात शारीरिक हालचाल कमी होत असल्याने कॅलरी बर्न करणं अवघड होतं. कॅलरी बर्न झाल्या नाही तर वजन वाढतं.

काय घ्याल काळजी
– पावसाळ्यात दुधाच्या चहाचं सेवन कमी करा.
– चहामध्ये साखर कमी टाका आणि जास्त वेळ चहा उकळू नका.
– चहामध्ये आलं, तुळशीची पाने आणि वेलची टाका.
– जर चहा जास्त पित असाल तर पाणीही भरपूर प्या.

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago